माझे गाव

आमणापूर,

ता. पलूस, जि.सांगली.

–प्रस्तावना–

प्रिती संगमाने न्हावून निघालेली कृष्णामाई दक्षिणेस संथ वाहते कृष्णामाई …… आनंदाचंउधानयेवूनकाठावरतीराहिलेलंसुख्सम्रुद्धिच्यावैभवावरजनताआरुडझालेलीआहे.  कृष्णेच्या पाण्याने रक्तवाहिन्या शिवारात गेलेने गावचा जवळपास संपूर्ण शिवार हिरवागार झालेला आहे. पक्षाचा किलबिलाट वानरांचा हैदोस, बाभूळ बन मावळतीच्या दिशेला विराजमान आहे.  पूर्वी तेथे वनराई होती उगवतीच्या दिशेला आमणापूर रेल्वे स्टेशन वाहणारा मंजूळ ‘काळा ओढा’ ओढयाखाली ध्यानस्त बसलेले हिंदू–मुस्लिमांचे आराध्य दैवत बंदे–गेसू राज.

कृष्णा नदीकाठचे एक अध्यात्मिक वैशिष्टे म्हणजे कहाडचा प्रितीसंगम बहे येथील श्री. रामाच मंदिर आमणापूर येथील श्री. समर्थ अंबाजी (बुवा) महाराज बाबाजी महाराज मठ श्री.ओम औदुंबर येथील दत्तमंदिर आर्दानी पावन झालेले कृष्णाकाठ आध्यात्मिक वारसा मोठया अभिमानाने सांगत आहे.

गावात माळी वाडयात श्रीरामच मंदिर, बाबाजी बुवा मठ, नागोला देवालय, श्री. गुरु गंगूकाका शिरवळकर वारकरी संप्रदाय हरिमंदीर, अंबाजी बुवा मठ–जोगा–जोगी मंदिर, नुकतीच राज्य शासनाने बांधकाम पूर्ण अवस्थेतील संरक्षक भिंत श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर संप्रदाय हरीमंदिर महादेव मंदिर, श्री. लक्ष्मी मंदिर अंबामाता मंदिर समोर दत्तमंदिर गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत हनुमान मंदिर, गणेश मंदिर, पुरातन काळातील दोन डिकमली ज्या गावात अंधकारातील जनतेला ‘तमसो मा ज्योर्तिगमय’ धरतीवर प्रकाशासाठी उपयुक्त रचना होती उत्तरेस ज्योतिबा मंदिर, मुस्लिम समाजाची मस्जिद वेताळया मंदिराचा का, आग्नेय दिशेस मुस्लिम समाजाची मस्जिद, कृष्णानदी काठी लगत मागासवर्गीय वस्तीत लक्ष्मीमंदिर, ज्योतिबा मंदिर, बंदे गेसूदराज, हनुमान मंदिर अनुगडेवाडी, श्री. समर्थ व देवीच्या मंदिर बोरजाईनगर येथील बोरजाईदेवी मंदिर. आदी मंदिरे धार्मिक श्रध्देची भावनेची मंदिरे उभारली बहुजनाच्या उन्नतीचे मूळ याच मातीत फुलले.

कर्मधर्म संयोगाने कृष्णेच्या काठावर वसलेले अंबापूर गाव निसर्गरम्य व थंडगार उत्साही व मनाला प्रसन्न करणारे वातावरण लाभलेली भू–माता कृष्णेच्या निळया डोहात दिसणारे रुन अवर्णनीय आहे.  कृष्णेच्या काठावरुन जाणाया पाऊलवाटा गावाच्या जनू रक्तवाहिन्या असलेचा भास पैलतीरावरुन झाल्याशिवाय राहत नाही इसवी सन 14 व्या शतकापासून गावाचा इतिहास बखरीमध्ये आढळतो इतिहासकालीन पुरावे आढळतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मिरजेचा किल्ला जिंकण्यासाठी, आदीलशाही, निजामशाहीशी संघर्ष करताना कृष्णा घाटावर पदस्पर्शाने पावन झालेले अंबापूर रामायन काळातील दंडकारण्य भूमिचा उल्लेखही दिसून येतो.

तिर्थक्षेत्र औदुंबर च्या धर्तीवर अंबापूर गावाचा आध्यात्मिक वारसा आहे.  श्री. समर्थ अंबाजी बुवा महाराज या हिमालयातील थोर तपस्वी साधुने जप ध्यान तप साधनेसाठी अंबापूरची निवड केलेली आहे. त्यावरुनच या भूमिचे असणारे महत्व समजून येते आपल्या पत्नीसह जिवंत समाधी रथसप्तमी माघ शुध्द सप्तमी 1697 रोजी घेतलेली उदाहरण दुर्मिहच मानावे लागेल.  सदरचा अंबानी बुवा मठ गावाचे आराध्य दैवत व श्रध्दास्थान आहे.  पुरातन बांधलेल्या कृष्णा घाटाला आध्यात्मिक मोठी आख्यायिका आहे.  कृष्णा नदीच्या मध्यभागापर्यंत गुहासदृश्य बोगदा आहे.  वास्तुशास्त्राचा गाभा असणारी पुरातन दगडी भिंत अभेद रुपाने कृष्णेच्या महापुराचा सामना करीत आहे. 

पुर्वीपासून सदर कृष्णाघाटावर कृष्णामाई उत्सव भरत होता व तशी बांधकाम योजना नदीच्या पात्रात दिसून येते.  मठाच्या समोर शंकराच्या पुरातन अनेक पिंडी आहेत.  श्री. बाबुराव ईश्वरा टोणपे व जगन्नाथ चिंचकर गुरुजी यांनी अंबाजी महाराजाचे मठाच्या मंदिराचे नविन बांधकाम मोठया कष्टाने अडचणींवर मात करुन बांधलेले आहे.  श्री. समर्थ अंबाजी महाराजाचे समाधीबाबतची आख्यायिका आजही कै. गणेश श्रीपती कुलकर्णी यांनी चारित्र वर्णन केलेले आहे.

आमणापूर झाले अमन हा उर्दू शब्द असून त्याचा अर्थ समृध्दी शांतता व विकास असा त्रिवेणी संगम घेवून आमणापूर नांव उदयास आले.  असा आमणापूरचा आध्यात्मिक व ऐतीहासिक वारसा जपणार गाव आहे.  परंपरांगत रुढी आध्यात्मिक साथ व शैक्षणिक विचार याचा सुरेख त्रिवेणी संगम झालेला दिसतो.  18 बलुत अठरा पगड समाज आजही आपआपली कामे परंपरा मोठया कष्टाने जपताना दिसतो.  जणू ते आपल कर्तव्य समजून काम करतात.