व्यक्तीमत्वे

राजकीय व्यक्तीमत्वे–

मा. राजाराम महादेव पाटील–
 • आर.एम. आण्णा म्हणून परिसरात प्रसिध्द आहेत सन 1972–84 या कालावधीत सरपंच म्हणून काम केले सभापती पंचायत समिती पलूस येथेही काम केले आहे सध्या ते संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सांगली येथे कार्यरत आहेत.
मा. प्रा. रामचंद्र पांडुरंग उगळे–
 • सन 1978 सालापासून गावाच्या परिसराच्या विकासाच्या पूर्व योजना गावासाठी परिसरासाठी राबवून गावाला प्रगती पथावर नेणेत त्यांचा सिहांचा वाटा आहे. 12 वर्षे जि.प सदस्य सांगली कार्यरत होते तासगांव सहकारी साखर कारखानाचे चेअरमनही होते सरचिटणीस कॉंग्रेस आय पक्ष सांगली जिल्हा सध्या कार्यरत आहेत.
मा. सौ. पुष्पलता रामचंद्र उगळे–
 • सध्या पंचायत समिती सभापती पदावर कार्य करीत आहेत.
मा. पांडुरंग लक्ष्मण कदम–
 • आमणापूर गावचे 14 वर्षे सरंपच म्हणून काम केलेले आहे.
मा. राजाराम कंुडलिक उगळे–
 • आमणापूर गावचे 5 वर्षे उपसरपंच तसेच पलूस सहकारी बॅंक लि पलूस चे व्हॉईस चेअरमन म्हणून काम केलेले आहे.
पोपट वसंतराव फडतरे–
 • क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर कार्य करीत आहे.
मा. सौ. बेबीताई आनंदा आंबी–
 • आमणापूर गावचे पहिल्या महिल्या सरपंच म्हणून कार्य केलेले आहे.
सौ. सुवर्णा शंकर तातुगडे–
 • आमणापूर गावचे महिला सरपंच म्हणून कार्य केले आहे.
सौ. छाया हिंदूराव कदम–
 • आमणापूर गावचे महिला सरपंच म्हणून कार्य केले आहे.
सौ. ताराबाई राजाराम पाटील–
 • सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे संचालक पदावर कार्य केलेले आहे.
श्री. जनार्धन कोंडीबा कांबळे–
 • वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली येथे संचालक पदावर काम केलेले आहे.