ग्रामदैवत

–ग्रामदैवत–

  • आमणापूर गावाचे ग्रामदैवत शक्ती व सेवाभक्ती यांचा संगम असणारे हनुमान दैवत याची परंपरा प्राचीन आहे.  स्वमी रामदास महाराज यांनी 12 दक्षिणाभिमुख मारुती मंदिराची स्थापना केली त्याच धर्तीवर संपूर्ण गावाच्या मध्यभागी लोकवर्गणीतून भव्य प्रशस्त मंदिर बांधलेले असून दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर आहे.  उर्वरित कळसाच काम पूर्ण करणेच्या दृष्टीने गावकयाचे प्रयत्न आहेत.  हनुमान जयंती दिवशी गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन सदरचा हनुमान मंदिर जयंती उत्सव समितीच्या वतीने मोइया उत्साहात साजरा करतात.

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेद्रियं बुध्दीमत्तां वरिष्ठं!

वात्मामजं वानर युथ मुख्यं श्रीराम दूतं शरण्यं प्रपदद्ये ।।

  • मनाप्रमाणे भक्ताच्या आशा पूर्ण करणार मन ताब्यात ठेवणार बुध्दीमान भक्ती व शक्ती मध्ये वरिष्ठ असणार विविध तापाला दूर पळवणार चांगल्या बाबींच नेतृत्व महत्वाच म्हणजे श्री. रामच दूत असणार गावाच ग्रामदैवत आहे. खया अर्थाने गावाला अभिमानास्पद असणारी ही बाब आहे.
    गावातील सर्व ग्रामस्थ दररोज हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन कोणत्याही कामाला शुभ कार्याला सुरुवात करत नाहीत.  कारण पुर्वेला सुर्यनारायण दक्षिणेला गणपती पश्चिमेला अंबामाता श्री. गुरुदेवदत्त उत्तरेस ज्योतिबा व हनुमान यांचे दर्शन एकाच ठिकाणी एकाच वेळी होते हे या गावचे वैशिष्टे होय.  हनुमान मंदिराचा गावातील सर्व मंदिर पूजनाचा मान गावातील गुरव समाजाला आहे.