धार्मिक, सांस्कृतिक

–धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव–

रामनवमी–

 • चैत्र शुध्द नवमी रामनवमी हा उत्सव माळी वाडयात पारंपारिक पध्दतीने केला जातो.  चैत्र शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत भजन नित्यकिर्तन हरिपाठ आदी गावातील वारकरी गंगूकाका शिरवळकर यांचे व श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी संप्रदाय यांचे वतीने साजरा करणेत येतो रामनवमी जन्मकाळ किर्तन सोहळयात कै. ह.भ.प. सोपान धुमाळ, हिंदू राडे महाराज यांचे किर्तन होते असे सध्या ह.भ.प. बाळासो पवार, ह.भ.प. पोपट माने महाराज व परिसरातील ज्येष्ठ किर्तनकार यांच्या किर्तनाचे आयोजन दरवर्षी पारंपारिक पद्ध्दतीने श्री. माळी कुंटुबिय स्वखर्चाने करतात.  रामनवमी नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम मोठया उत्साहात होतो.  सदर महाप्रसादाचा लाभ घेणेसाठी वाडया वसयांवर व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात. 

हनुमान जयंती–

 • चैत्र शुध्द पौर्णिमा या दिवशी हनुमान जयंती असते किर्तनकार किर्तनात हनुमान जयंतीचे आध्यात्मिक महत्व व माहिती सांगतात तद्नंतर हनुमान जयंती पुष्पवर्षाव करुन मोठया उत्साहात साजरी करणेत येते.  हनुमान जयंती उत्सव समिती माफ‍र्त सांस्कृतिक कार्यक्रम भव्य कुस्त्यांचे मैदान भरविले जाते.  दुबैली गाडयाच्या शर्यती गावातील गुणवंत हौशी नाटय कलाकाराच्यांवतीने श्री. संभाजी बाळकृष्ण नलवडे नाटय लेखक–दिग्दर्शक, निर्माता यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक हनुमान जयंतीला नाटक सादरीकरण करुन गावातील नागरिकांना मनोरंजनाचा आस्वाद दिला जातो.
 • तुकाराम महादेव राजमाने यांची दुपारी हनुमान जयंतीचा महाप्रसाद दुपारी वितरीत केली जाते.  सदरची खीर महादेव राजमाने यांची प्रसिध्द आहे.  हनुमान जयंती साजरी झालेनंतर गावातील ग्रामस्थ आपलया ऐपतीनुसार स्वच्छेने सकाळपासून गहू, गूळ आदी महाप्रसादासाठी स्वत:हून आणून देतात हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने सदरच महाप्रसाद सायंकाळी तयार करुन भरवताना व ग्रामस्थांना वितरीत केला जातो. 

बारेजाई देवीची यात्रा–

 • आमणापूर गावाचे भौगोलिकदृष्टया एक महत्वाचे वैशिष्टये म्हणजे गावातील 35% लोकसंख्या वाडयावस्त्यांवर राहत आहे.  बारेजाईनगर येथील गावातील सर्व नागरिक अक्षयतृत्तीया या दिवशी बारेजाई देवीची यात्रा मोठया उत्साहात साजरी करीत असतात.  सदर यात्रेच्या निमित्ताने देवी भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा, यात्रा समितींच्यावतीने आयोजित करणेत येतात. 

मोहरम–

 • हा सण हिंदू–मुस्लिम ऐक्याचा सण मुस्लिम महिण्याच्या पाहिल्या महिन्यात पाचव्या दिवसापासून 10 दिवसांपर्यंत ताबूत यांची उभारणी करुन साजरा केला जातो उगळे, घाडगे, चौगुले पाटील यांना या ताजिया पुजनाचा मान असून हिंदू–मुस्लिम आबाल वृध्द हा सण पारंपारिक पद्धतीने श्रध्देने साजरा करतात. 

भावई उत्सव–

 • महाराष्ट्रांतील प्रसिध्द सव्वा लाख आहे येथील भावई–जोगण्याचा उत्सव आहे.  सदरची परंपरा वैशिष्टपूर्ण आहे कारण भावईचा सण पुर्वीच्याकाळी गावातील अठरा पगड बलुतेदार यांचा सर्वात महत्वपूर्ण उत्सव भावईचा आहे त्याच धर्तीवर पारंपारिकपणे व मोठया उत्साहात साजरा केला जातो.  यापूर्वी गावातील शेतकयाच्या शेतीतील पेरण्या मशागती पूर्ण झालेल्या असतात त्यामुळे गावातील सर्वांचा उत्फूर्त सहभाग असतो.  सकाळी महादेव मंदिरात दिवा काढला जातो.  दिवापूजन झालेनंतर राजाराम दत्तात्रय कुलकर्णी, विष्णू गजानन, कुलकर्णी व कै. हरिभाऊ महिपती कुलकर्णी, नारायण दामोदर कुलकर्णी या मानकयांच्या घरी दिपपूजा करुन जागो जागी यांची पूजा करतात.  दिपपूजाननंतर मोठया गाडग्यात पिठाचे पाणी घेवून मानकयांच्या अंगावर फेकले जाते, त्यावेळी खालील आरोळी सर्वजण देतात. 
 • ‘गावडा गावडी बसली गावडी अशी गावडी शहाणी दाताड उपसून काढी धनमंगल’ गावडा गावडी नसली गावडी गावडींच्या गांडीत मोडली काडी धनमंगल’ वरील घोषणा दिल्यानंतर दिवा काढला जातो त्यातून बाहेर येणाया पक्षी प्राण्यांवर वर्षातील पावसाचा अंदाज गांवातील ज्येष्ठ नागरिक थकत करतात आणि खया अर्थाने त्यांनी सांगितलेला अंदाज खरा ठरतो याचा प्रत्यक्ष या उत्सवाच्या निमित्ताने गावातील शेतकरी व ग्रामस्थांना येतो. 
 • तद्नंतर परीट व नाभिक समाजातील काही मंडळी पिसे सकाळी प्रत्येक घरी जावून लिबांचा पाला प्रसाद म्हणून दिला जातो.  गावातील सर्व महिला घरासमोर पाट, पाटावर पाण्याचा तांब्या, खोबरे व गूळ ठेवून पिसे यांचे स्वागत केलेले असते सदरचा पिसा तांब्यातील पाणी पायावर ओतून लिबांचा प्रसाद ठेवून गूळ खोबरे व देणगी रक्कम घेवून जातो. 
 • जोगा होण्याचा मान नाभिक समाजाला आहे व जोगी होणेचा मान कुंभार समाजाला आहे जोगा हातात कुंड व जोगीच्या हातात तलवार व कुंड असतो.  सदरचा कुंड ज्या गावात राहीले तिथेच हा भावई सण साजरा करणेत येतो त्यासाठी रामोशी व इतर समाज कुंडाच्या संरक्षणासाठी तलवार व काठया हातात घेवून कुंडाच्या संरक्षण स्वत:च्या प्राणापलीकडे जावून केले जाते. 
 • ‘‘आवरीच्या मवारीच्या कराडीच्या कोल्हापूरीच्या सव्या जोगिणी सव्वा मिळाल’’ अशा घोषणा देत हनुमान मंदिरापासून गावाबाहेरच्या रस्त्यापासून कृष्णा नदीच्या काठावरुन मिरवणुकीने जोगा जोगिणीचा मंदिरापर्यंत जातात पोलिस पाटील व सर्वांच्या आदेशानुसार जोगा जोगणिचा मंदिरापर्यंत जाते पळण्याच्या कार्यक्रम पाहण्यातून परिसरातील हजोरो ग्रामस्थाच्या साक्षीने पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.  सदरच्या भावईचा मान गावातील सूर्यवंशी, टोणपे, पोलिस पाटील कुलकर्णी, सुतार, रामोशी, कोतवाल, गुरव, तराळ, कैकाडी, फडणे, उगळे, आवटे आदींना आहे.  सांस्कृतिकतेतूनच मानवतेचे कार्य करणाया परंपरचे काम आजही येथील बारा बलुतेदार समाज करत आहे.

गणेश चतुर्थी–

 • भाद्रपद शुध्द चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती हा उत्सव गणेशोत्सव मंडळे अत्यंत उत्साहाने करत असतात प्रामुख्याने शिवाजी मंडळ, विशाल मंडळ, मध्यवर्ती मंडळ, भैरवनाथ मंडळ, वेताळबा मंडळ आदी गणेशोत्सव मंडळे सद्यस्थितीतील देखावे मनोरंजनात्मक कार्यक्रम स्थानिक युवकांना नाटयकलेची माहिती देवून सामाजिक समस्येवरील नाटीका तयार करुन नागरिकांच्यात प्रबोधन केले जाते.

गोकुळ अष्टमी–

 • गोकुळ अष्टमी दिवशी गावातील युवक मंडळाच्या माफ‍र्त दंहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा मोठया उत्साहात साजरा केला जातो.
 • होळीपेठ मित्र मंडळाच्या वतीने 14 जानेवारी या मकर संक्रांत दिवशी दिपोत्सव गावातील हनुमान मंदिरासमोरील पुरातन दोन डिकमलीवर घेतला जातो. सदरच्या पुरातन डिकमली स्वच्छ धुवून रंगरंगोटी केली जाते भव्य आकर्षक रांगोळी काढून सायंकाळी दिपोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो.
 • कार्तिक शुध्द पौर्णिमा या दिवशी श्री. समर्थ अंबाजीबुवा मठ येथील स्वच्छता समर्थ युवक मंडळ अनेक वर्षे करत असून कृष्णा घाटपरिसराची स्वच्छता करुन दिपोत्सव मोठया उत्साहाने साजरा करतात.

बंदे गेसूदराज ऊरुस–

 • फेब्रुवारी महिन्यात मोठया उत्साहाने ऊरुस उत्सव समितीच्या वतीने मोठया प्रमाणात साजरा करणेत येतो. बंदे गेसूदराज नवाज यांचा ऊरुस हिंदू–मुस्लिम बांधव एकदिलाने मोठया उत्साहाने भरवतात. ऊरुसात गंधराज सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्यांचे भव्य मैदान, तमाशा बैलगाडया शर्यती आदी कार्यक्रम दरवर्षी साजरे करणेत येतात हिंदू–मुस्लिम ऐक्याचा सण दुर्मिळ मानावा लागेल. लहान मुलांना आकर्षित करणारी घोडा गाडी, पाळणा, रेल्वे खेळणी दुकाने मिठाई दुकाने असतात.
 • बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले ग्रामस्थ नातेवाईक या ऊरुसानिमित्त एकत्र येतात. ऊरुसकाळात गावातील बाजारपेठ आकर्षक असते. गावात स्थानिक ग्रामस्थ आणि पाहुण्यांची गर्दी असते.
 • 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर हे राष्ट्रीय सणही मोठया उत्साहाने साजरे केले जातात राष्ट्रीय ध्वजा रोहणाच्या निमित्ताने ध्वजवंदन करणेसाठी गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात हजर असतात. शाळेतील विद्यार्थी, सांस्कृतिक कार्यक्रम विविध कसरतीचे प्रयोग करत असतात.

बाबासाहेब आंबेडकर जयंती–

 • निर्मित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरा करणेत येतो.  बुध्दपौर्णिमा व आंबेडकर जयंती मोठया उत्साहाने साजरी करणेत येते.