इतिहास

–स्वातंय सैनिकाचा ऐताहासिक वारसा–

स्वातंय सैनिकाचा ऐताहासिक वारसा आमच्या गावाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्रबोस यांच्या चलेजाव आंदोलन, भारत छोडो किंवा देव देश अन् धर्मापायी प्राण घेतल हाती. लोकनेत्यांच्या आवाहनानुसार गावातील देशभक्तीची प्रेरणा घेवून स्वातंय सैनिक गोविंदराव बाबूराव कदम खोत तत्कालीन तरुण पिढीने ऐताहासिक कामगिरी केलेली आहे याचा सार्थ अभिमान गावातील नागरिकांना आहे. आमणापूर गावाला स्वातंयलढयाच्या माध्यमातून आपली कर्मभूमि मानणाया कै. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री सरकार महर्षी याच भूमित कतृ‍र्त्व पराक्रम बहारला.

जोग मळयाजवळ भिलवडीच्या अलीकडे कै. खोत बापूच्या नेतृत्वाखाली रेल्वे पाडण्याचा पराक्रम याच मातीतील तरुण कार्यकत्र्यांनी केला. किर्लोस्करवाडी–भिलवडी दरम्यान रेल्वेचा पोलीस डबा उडविला सरकारी बंगले जाळणे, रेल्वेस्टेशन जाळणे, इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याचा पुतळा तासगांव कचेरीसमोर जाळला. इस्लामपूर सन 1942 च्या इस्लामपूर कहाडचा मोर्चाचे नेवृत्वही खोत बापूंनी केले पंडया या किर्लोस्कर कंपनीतील अभियंत्याला गोळी लागली त्यावेळी खोत बापू हजर होते. महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा दक्षिण विभागात कै. वसंतदादा पाटील क्रांतिअग्रणी जी.डी. लाड कै. क्रांतिवीर नाना पाटील सध्या हयात असणारे क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्या बरोबरी या गावाच्या वीरपुत्राने स्वातंयलढयात महत्वपूर्ण कामगिरी केली. 3 सप्टेंबर 1942 रोजी वि.स. पागे व खोत बापू यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर क्रांतीकारकांच्या इतिहासात नोंद घेणेसारखी कामगिरी तिरंगा तत्कालीन मामलेदारांच्या हस्ते केली. स्वातंयलढयात भारावून गेलेल्या त्यांच्या बरोबरीने कै. तुकाराम उगळे, कै शंकर यशवंत अनुगडे, कै तुकाराम उगळे, कै धोंडी उगळे, कै. रामचंद्र माळी, कै. मारुती जाधव, कै. तुकाराम यादव कै बापू औटे, कै गोविंद जाधव, कै. आनंदा शिंदे, इब्राहिम पिजांरी, कै. वासुदेव कुलकर्णी, कै. दामोदर उगळे, कै. केशव पवार, कै बापू राडे, कै. बाबू कांबळे, हिंदू राडे, कै दत्तू पाटील गावचे पाटील पहिले सरपंच आदींनी खादंयास खादा लावून मातृभूमिच्या संरक्षणांसाठी इंग्रजी सत्तेला हादरा देणेच महत्वपूर्ण कार्य याच भूमित झाले.

पूर्वीचा सातारा जिल्हा आजचा दक्षिण सातारा आजचा सांगली जिल्हा निर्मिती झालेनंतर कै गोविंदराव बाबूराव खोत तासगांव कॉंग्रेस पक्ष अध्यक्ष होते त्यावेळी कै वसंतदादा पाटील कॉंग्रेस पक्षाचे सचिव होते पुढील काळात वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु या मातीला बापूना कधीही विसरले नाहीत बापूनीही सत्तेची कास न धरता लोकसेवेचे वेत शेवटपर्यंत ठेवले हिच त्यागाची भूमिका आजच्या राजकीय नेत्यांनी घेतल्यास आज लोकशाहीत लोकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांची अडचणींची सोडवणूक करणारे ठरेल. कै. स्वातंय सैनिक गोविंद जाधव यांनी स्वातंयपूर्वकाळात नाणी बंदुका तलवार अशी शस्त्रे तयार केली स्वातंय लढयातील झालेल्या शिक्षेपोटी येरवडा तुरुगांत बांधलेली दगडी भिंत आजही पहावयास मिळते, तिर्थक्षेत्र औदुंबर येथील दत्त देवालयाचे नक्षीदार बांधकाम केले कारागीर उत्कृष्ठ मंदिराचे कळस काम करणारे स्थापत्य कलाकार व भेदीक गायनात पटाईत होते.

स्वातंय सैनिकांचा कारावास–

स्वातंय सैनिक शंकर गणपती राजमाने– येरवडा तुरुंगात 4 वर्षे शिक्षा 400 रुपये दंड स्वातंय लढयाच्या आंदोलकाळात 4 वर्षे फरारी होते त्यामुळे त्यांचे वडिलांना मुलगा सापडत नाही म्हणून 2 महिने अटक सुरली घाट टपाल मोटार लुटली मात्र अहमदनगर रेल्वे स्टेशनवर अमेरिकन बनावटीच्या रिल्व्हॉलर पिस्तुलासह अटक करणेत आली 25 काडतुसे बरोबरी होती. स्वातंय मिळाल्यानंतर आण्णाची सुटका झाली त्यावेळी गावातील नागरिकांनी बैलगाडीतून आण्णांची भव्य मिरवणूक काढून सत्कार केला होता. आजही आण्णा नागरिकांच्या अडचणीवर प्रश्नांवर मार्गदर्शन करतात. समाजवादी चळवळीची माहिती गावातील युवकांना सातत्याने देत असतात. आजही आण्णा तरुणांना लाभलेले एवढे परिश्रम करतात.

कै. स्वातंयसैनिक तुकाराम उगळे– स्वातंय लढयात कै. खोत बापूंच्या बरोबरीने आंदोलनकाळात हिरीरीने भाग घेवून स्वातंयासाठी तळमळीने कार्य करणारा कार्यकर्ता स्वातंय मिळालेनंतर समाजकारणासाठी गावाच्या अडचणी सोडवण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न केले. विसापूर जेलमध्ये 7 महिने तुरुंगवास भोगला. कै. खोतबापू कै.राम माळी, कै. शंकर अनुगडे, कै. तुकाराम उगळे, कै. धोंडी उगळे, कै. मारुती रामा जाधव, इब्राहिम पिंजारी, बापू औटे, आनंदा शिंदे, तुकाराम शिंदे, वासुदेव कुलकर्णी, दामोदर उगळे आदींना 7 महिने तुरुंगवासाची शिक्षा अहमदनगर येथील विसापूर जेलला झाली परंतु स्वातंय सैनिंकांचा मुख्य प्रयत्न भूमिगत राहून गनिमी काव्याने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न होता असा या गावाचा स्वातंय चळवळीचा ऐताहासिक वारसा आहे.

केंद्रशासन स्वातंयसैनिक – कै. गोविंदराव बाबूराव कदम, शंकर यशवंत अनुगडे, तुकाराम ज्ञानू उगळे, धोंडी नारायण उगळे, शंकर गणपती राजमाने, रामचंद्र आग्नू माळी, मारुती रामा जाधव, तुकाराम कृष्णा यादव, बापू भगवंत औटे, गोविंद आप्पा जाधव, आनंदा पांडु शिंदे, तुकाराम राऊ शिंदे, इब्राहिम रहिमान पिंजारी, वासुदेव महिपती कुलकर्णी.

महाराष्ट्र शासन स्वातंयसैनिक – कै. दामोदर दादा उगळे, केशव बाळा पवार, बापू रामा राडे, बापू बाळा कांबळे, हिंदू मारुती राडे, दत्तू तात्या पाटील.