रोजगाराची उपलब्धता

रोजगाराची उपलब्धता–

शेती–

गावातील प्रमुख व्यवसाय शेती व दूध व्यवसाय आहे. शेतीला प्रामुख्याने ऊस द्राक्ष गहू हरभरा सोयाबीन भात भूईमूग कांदे पालेभाल्या ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. बोरजाईनगर विभागातील द्राक्षे मुंबई कोलार बैंगलोर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात द्राक्ष पीक घेतले जाते. श्रीकांत लक्ष्मण माळी, राजेंद्र कुमार माळी, दत्तात्रय कुमार माळी, हेमंत वसंत अनुगडे, पांडुरंग तुकाराम काटे आदींनी द्राक्षे पिके घेतात. तसेय अंकुश तानुगडे, निवृत्ती सखाराम पाटील, उगळे, भोसले आदी शेतकरी पिके प्रामुख्याने मोठया प्रमाणात घेतात. परंतु एकीकडे समृध्दी व आरपाड जमिन ही परिस्थिती आता नापिकी हा मोठया प्रमाणातील शेती अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून गावात दुग्ध व्यवसाय मोठया प्रमाणात केला जातो दर आठवडयाला दुधाचे पगार होत असल्याने शेतकरी व मजूर या व्यवसायावर भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दूध संकलनाचा धंदा सुरु केला आहे. दररोज एवढे दूध संकलन लिटर 2100/– केले जात आहे. गावातील शेळी मेंढी पालनही मोठया प्रमाणात केले जात आहे.

गावात एक ठिकाणी रेशीम उद्योग, तीन हॉटेल्स आणि किराणा मालाची कडधान्य व्यवसाय काही तरुणांनी जीप टेम्पो ट्रक घेवून स्वत: रोजगार उपलब्ध केला आहे. चप्पल व्यवसाय पारंपारिक पध्दतीने चर्मकार समाज करीत आहे. वीटभट्टी कृष्णामाई मजूर संस्था कार्यरत आहे. अभय मसाले आजही जिल्हयात प्रसिध्द आहे.

किर्लोस्कर बदर्स कंपनी मध्ये पुर्वी गावातील अनेक कामगार होते. परंतु जागतिककरणामुळे आजही जवळपास मोठया प्रमाणात कामगार काम करतात. पलूस एम.आय.डी.सी तासगांव सहकारी कारखाना सूतगिरणी क्रांतीकारखाना आदी ठिकाणी युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

गावातील महिला बचत गटातील महिलाही स्वत:चे छोटे उद्योग सुरु करत आहेत. मिरची कांडप, मेणबत्ती तयार करणे शाळेतील मुलांना खाऊ वाटप करणे अंगणवाडीतील लहान मुलांना सकस आहार देणे आदी उद्योग करीत आहेत.

गावातील काही युवकांनी उच्च शिक्षण घेवून अमेरिका, युरोप, चीन पुणे–मुंबई येथे मोठया पदावर कंपनी मधून कार्यरत आहेत.