पतसंस्था

गावातील पतसंस्था खालीलप्रमाणे–

  1. श्रीराम सहकारी पतसंस्था मर्या. आमणापूर चेअरमन जयवंत गोविंद निकम हे असून आतापर्यंत गावातील गरजू व गरीब ग्रामस्थांना आर्थिक अडचणींच्या काळात कर्जवाटप केलेले असून गरीब नागरिकांना सहकारातून सहकार्य करुन आर्थिकदृष्टया सक्षम करणेचा प्रयत्न केलेला आहे. परिसरात पतसंस्था वनटाईम सेंटलमेंट या राष्ट्रीयकृत बॅंकेची योजना राबवून कर्जातून कर्जमुक्ती देणेचा प्रयत्न केलेला आहे.
  2. श्री राजाराम ग्रामीण बिगर शेती सरकारी पतसंस्था चेअरमन हे असून आतापर्यंत गावातील गरीब ग्रामस्थांना आर्थिक अडचणीच्या काळात कर्जवाटप केलेले असून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आर्थिकदृष्टया सक्षम करणेचा प्रयत्न केलेला आहे.
  3. संस्थेची वसूली दरवर्षी केली जाते.
  4. श्री बसवेश्वर सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाचे चेअरमन आप्पासाहेब आत्माराम कोरे असून थोडयाच कालावधीत गरजू व्यक्तींना कर्जपुरवठा केला जातो. संस्थेमाफर्त सोनेगहाण कर्जवाटप त्वरीत केले जाते. संस्थेची वसुलीही मोठया प्रमाणात आहे.
  5. गावात महिलांचे 70 बचत गट आहेत तीन शेतकरी मंडळे आहेत. आजी माजी सैनिक संघटना सैनिकांच्या कल्याणकारक योजना राबवत असतात. मुलांना व्यायाम व कसरतीची माहिती संस्थेमाफर्त दिली जाते. दारिद्रय रेषेखालील 7 महिला बचतगट बचतगटांना शासन निर्णयान्वये आर्थिक सहकार्य केले जाते. गाव निर्मलग्राम करणेसाठी सुमारे 25 जणांना कर्जपुरवठा केलेला आहे. व शौचालय बांधकाम केलेले आहे. बॅंक आॅफ इंडिया यांचेमाफर्त गावात 170 शौचालय बांधकाम पूर्ण केलेले आहेत. शिवाय शेती पंतप्रधान रोजगार योजना व्यवसायासाठी बॅंकेने गावात कर्जवितरण मोठया प्रमाणात केलेले आहे.

इतर संस्था–

  • स्मूर्ती सार्वजनिक वाचनालय ग्रामीण भागातील युवकांना मार्गदर्शन करुन संस्कारक्षम बनवून गावात वाचनाची आवड निर्माण करणेच्याहेतूने मोफत सार्वजनिक वाचनालयाची 12 मे 1997 रोजी स्थापना करणेत आली आहे. सर्वांच्या सहकार्यातून 3000 एवढी पुस्तके नियतकालीके व दैनिके वर्तमानपत्र यांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला महत्व दिले.
  • श्रीराम बझार सहकारी ग्राहक भांडाराचे चेअरमन प्रमोद विष्णू जाधव आहेत. गावातील एकमेव बाझार आज एकाच ठिकाणी सर्व वस्तू एकाच ठिकाणी माफक माल मिळणारा बझार आहे.