विशेष व्यक्तीमत्वे

विशेष व्यक्तीमत्वे:–

 • कै. रामचंद्र सिताराम गुरव:–तबला व सुरपेटीचे नामवंत वादक शास्त्रीय संगीताचे परिपूर्ण ज्ञान असणारे व्यक्तीमत्व.

 • कै. आकाराम कदम:–भारतीय पांरंपारि खेळातील दांडपट्टा कसरपट्टू म्हणून नावलौकीक त्यांनी मिळवलेला होता अत्यंत चपळ पध्दतीने पूर्वीचे खेळ करण्यात हातखंडा होता तसेच ते शिवकालीन खेळ करत असत.

 • कुस्ती मार्गदर्शक बापूसाहेब राडे:–कुस्तीक्षेत्रातील माहीती असणारे प्रेमळ व्यक्तीमत्व कुस्ती क्षेत्रात अनेक पैलवान तयार करुन महाराष्ट्राची आंतराष्ट्रीय कुस्तीक्षेत्रात शान वाढवली जाकार्ता हिंदू केसरी मारुती माने, दादू चौगुले खाशाबा जाधव आदी कुस्तीक्षेत्रातील नामवंत त्यांना गुरु मानत कोल्हापूर जिल्हा क्रिडाधिकारी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कुस्तीचे समालोचन नेमक्या सहजसोप्या भाषेतून स्फूर्ती देणारे वस्ताद म्हणून सुप्रसिध्द आहेज आजही त्यांना महाराष्ट्रातून कुस्ती समालोचनासाठी राडे सरांना मानाने बोलवले जाते.

 • कै. पांडुरंग महादेव गोरड:–ज्ञानेश्वरीतील ओव्या मुखोद्गत असणारे व प्रवचनातून लोकांना महाभारत,रामायण,इतर पौराणिक ज्ञान देवून भाविकांना मंामुग्ध करत.

 • कै. नारायण ज्ञानोबा डोंबे:–ग्रामीण भागातील भारूड लोकगीते म्हणण्यात पटाईत होते तसेच शीघ्रकवी होते. कवीवर्य संधाशु, कवी सायनाकर मॅडम यांनी प्रशस्तीपत्रक व बक्षिस देवून त्यांचा गौरव केला होता. ग्रामीण भागातील शीघ्रकवी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

 • चांगदेव गंगाराम कुंृभार:–गावातील पहिले पी.एच.डी. पदवी प्राप्त तसेच त्यांनी अणुसंशोधन केंद्रात सॉइन्सीट या पदावर कार्य प्रशंसनीय आहे.

 • रमेश नारायण राजमाने:–चाटर्ड अकांउटंट सांगलीतील प्रख्यात लेखापरिक्षक सध्या पलूस सहकारी बॅंकेत तज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत.

 • नितीन दिनकर कुलकर्णी:–अमेरिकेत नोकरी गावातील गुणवंत्त विद्यार्थी विद्यार्थींनींना नियमित दरवर्षी बक्षिस वितरण करतात त्यांचे भाऊ निलेश दिवाकर कुलकर्णी हेही अमेरिकेत नोकरीसाठी गेलेले आहेत.

 • संभाजी बाळकृष्ण नलवडे:–आमणापूर परिसरातील ज्येष्ठ नाटयकर्म नाटय लेखक दिग्दर्शक, संचालक त्यांनी स्वत: नाटके पुढीलप्रमाणे पवित्र प्रतिज्ञा, तुझी साथ हवी, सुनबाईच सोन झाल, सासू नंबर वन, संघर्ष ज्वाला, रयतेच्या दरबारी, चौकटी कारभारी, वरील नाटके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे या मराठी चित्रपटात काम केलेले आहे.

 • राजाराम दत्तात्रय कुलकर्णी:–गावातील सर्वात वयोवृध्द सर्व विषयाची माहिती असणारे ज्येष्ठ वय वर्षे 101.

 • पांडुरंग आण्णा राडे:–भूषण प्रिटिंग प्रेस व तीन कोटींचे फॉर्मिंग पुण्यात आहे.

 • हणमंत ज्ञानू फडतरे:–जेष्ठ वकिल आणि शिक्षणमंत्री संदानंद वर्दे यांची मुलाखत दूरदर्शने घेतलेली होती. त्यांनी लिहीलेले पुस्तक हे ह. भ. प.बाबा महाराज साताराकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेले आहे.

 • उस्मान लालू संदे:–पूर्वीच्या काळातील प्रसिध्द हकीम.

 • कै. दत्तू तात्या पाटील:–गावचे पहिले सरपंच.

 • तुकाराम ईश्वरा टोणपे:–कृष्णामाई लिफ्ट इरिगेशनची स्थापना केली.

 • प्रशांत गजानन भिसे:–गावातील एकमेव सामाजिक न्याय विभागाकडून शिष्यवृत्ती मिळवून पायलट.

 • मिलिंद सहदेव भिसे:–डी.वाय.एस. पी.

 • अल्लाबक्ष सुलेमान मुलाणी:–प्रख्यात तमाशा कलावंत.

 • गणू कैकाडी:–पारंपारिक पोटावर ताश वादक.

 • गुलाब अल्लाबक्ष मुलाणी:–आधुनिक शाहीर तमाशा कलावंत.

 • भगवान नाना कांबळे:–आॅडीटर लेखापरिक्षक.

 • शामराव श्रीपती कुलकर्णी:–सियर कॉलनी सांगली स्थापना.

 • दिलीप बाळकृष्ण नलवडे:–सांगलीतील ज्येष्ठ वकील.

 • कै. कृष्णा कोकळे:–प्रसिध्द ढोलकी पदू.

 • कै. शाहीर तानाजी धोंडी भोसले:–प्रसिध्द लोकशाहीर ग्रामीण भागातील लोकगीते शाहीरीचे पोवाडे आकाशवाणीवर कार्यक्रम.

 • तानाजी दत्तू माळी बाळू दत्तू माळी:–लोकगीते लोकशाहीर.

 • सुभाष नामदेव सुर्यवंशी:–आधुनिक गीताचे गायक सारे-गम-प –झी.टी.व्ही वर कार्यक्रम.

 • कै. गणेश श्रीपती कुलकर्णी:–4 चित्रपट निर्मिती.

 • तुकाराम सिताराम आमणापूरकर:–साधना मंदिर, छत्रपती शिवाजी गृहनिर्माण संस्था, छत्रपती शिवाजी सहकारी बॅंकेची इंदौर मध्ये स्थापना करुन सहकार राजकारण अर्थकरण साहित्य क्षेत्रात दादांनी इंदौरमध्ये आपले मोठे नावलौकीक केले आहे.

 • शशिकांत भगवान राडे:–शास्त्रीय नृत्य भरत नाटयम भारतीय लोकनृत्य पाश्चात्य नृत्य धनगरगीत, बालनृत्य, दांडीचा गरबा, डोंगरीनृत्य, भांगडा आदी अनेक नृत्य मे 09 मध्ये होणाया ओरिसा उत्तरांचल येथे होणाया राष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड मोस्ट वॉन्टेड या मराठी चित्रपटात नृत्य.

 • आदम इमाम सुतार:–पक्षी मित्र,सर्पमित्र म्हणून परिसरात प्रसिध्द आहेत.

 • घनाजी प्रकाश उफर् बाळासाहेब तानुगडे:–हा विद्यार्थी मनष्य बळ विकास मंत्रालयामाफर्त सन 2006 मध्ये घेण्यात आलेल्या गेट या स्पार्धात्मक परिक्षेत 99.86/ गुण मिळवून देशात सर्वप्रथम आलेला आहे. मुंबई येथील एन. आय टी.या परिक्षेत प्रवेश मिळवून सन2008 मध्ये इंडस्ट्रियल इजिनिंअरिंग मध्ये आपले पदधीधर शिक्षण पूर्ण केले.

 • कै. ह.भ. प. हिंदू कुंडलिका राडे:–श्री गुरू बाबासाहेब आजरेकर संप्रदाय फडावर किर्तनाचा सन्मान ज्ञानेश्वरीतील ओव्या, संस्कत श्लोक, तुकाराम महाराज अभंगवाणी, भागवत नामदेव गाथा यांचा पौराणिक मोठा अभ्यास व किर्तनाचा मोठा अभ्यासपूर्ण भाविकांना समजेल अशा भाषेत वयाच्या 20व्या वर्षापासून 90व्या वर्षापर्यंत विना बिदागी किर्तन केले. कर्मण्येवादीकारस्ये मा फलेशू……… याचे शेवटपर्यंत पालन केले. शासनाची कलाकार मानधन नाकारणारा विरळा किर्तनकार आहे.

 • शिवाजी बाळू तातुगडे:–एस बी –1 सी आय डी हेडकॉंन्स्टेबल म्हणून सध्या मंुबई मध्ये कार्यरत बॉम्बस्फोट, दरोडा खून पोलीस चकमकीत सहभाग त्यामुळे महाराष्ट्र राज्य बी जी सन्मान चिन्ह 2002 रोजी मिळाले 164 बक्षिसे 26/1/2003 प्रजासत्ताक दिनी मा डॉ. ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या हस्ते राष्ट्रपती पारितोषिक व सन्मानचिन्ह मा. महमंद फजल राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनीही पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह 2004 रोजी मिळाले आहे.

 • प्रसाद नारायण रिसबूड:–कृष्णामाई देवस्थानाचे विश्वस्त विठ्ठलकृपा पाणीपुरवठा संस्था मर्या.आमणपूरची स्थापना करून 100 एकरक्षेत्रबागायत केले. सध्या सांगली येथे ओव्हर…………. म्हणून आहेत. त्यांचे घराण्यातील विठ्ठल बालाजी रिसवूढ यांनी 100 वर्षापूर्वी उत्सव आमणापूरात सुरू केला.

 • डॉ. अभय वामन रिसबूड:–अमेरिक कॉलिफोर्निया येथे एम डी कॅन्सर स्पेशालिस्ट तेथेच वास्तव्य.

 • भास्कर आकाराम तातुगडे:–मानसिक आजाराबद्दल शास्त्रीय उपचाराबाबत आय.पी.एच. चा मा. प्रकाश आमटे यांच्या हस्ते मानाचा किज पुरस्कार 2008 राज्यस्तीरीय पुरस्कार.

 • लखू बाजी धाडणे व हिंदू बाजी धाडगे:–या दोन जणांनी आरोग्य उपकेंद्रासाठी गावात बक्षीस पत्राने जागा दिली आहे. अनुगडेवाढी जिल्हापरिषद शाळेसाठी शिवाजी हरी अनुगडे आनंदा ज्ञानू अनगडे निवृत्ती हरी अनुगडे यांनी खुशीने बक्षीस पत्रान्वये जागा दिली.

 • आमणापूर गावातील प्राचार्य /प्राध्यापक:–
 • मा. प्राचार्य रामचंद्र पाडुरंग उगळे.
 • मा. प्राचार्य शंकर बापू शिंदे.
 • मा. प्राचार्य अविनाश जगन्नाथ गोरंबेकर.
 • मा. प्राचार्य Jagdish Sadashiv Aute
 • मा. प्राचार्य रमेश नारायण राजमाने.
 • मा. प्राचार्य उत्तम पाडंुरंग उगळे.
 • मा. प्राचार्य चांगदेव गंगाराम कुंभार.

मा. प्राचार्य. प्रमोद विष्णू जाधव