समस्या

समस्या–

  1. आमणापुर गावातील समस्या पुढीलप्रमाणे.
 • केंद्रशासन व राज्य शासनाने आरवड जमिन सुधारणा करणेसाठी मास्टर प्लॅन तयार करुन जमिन लागवडीलायक करणेसाठी प्रभावी उपाययोजना करणे.
 • गावातील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी आमणापूर–विठ्ठलवाडी स्वतंय नळपाणीपुरवठा योजना मंजूर करणेत यावी.
 • पशुधन आरोग्याचा प्रश्न सोडविणेसाठी पशुवैद्यकीय दवाखाना.
 • आमणापूर गाव नदीकाठ भाग असलेने जमिन काळी असलेने गावातील अंतर्गत सर्व रस्ते दगडी फरशी बसवून किंवा कॉंक्रिटकरण करणेत यावेत जेणेकरुन.
 • महापूराच्या कालावधीत रस्ते खराब होणार नाहीत.
 • बेरोजगार युवकांसाठी महिलांसाठी उद्योगधंदा मिनी एम आय डी सी माध्यामातून उपलब्ध करुन देणेत यावे गावातील ग्रंथालयासाठी इमारत बांधकाम मंजूर व्हावे.
 • निर्मलग्राम अभियानांतर्गत गावातील शौचालय बांधकाम मोठया प्रमाणात झालेने वाहती गटार बांधकामासाठी शासनाने अनुदान मंजुर करावे.
 • प्रधानमंत्री सडक योजनेतून आमणापूर ते श्रीरामनगर रेल्वे स्टेशन ते बोरजाईनगर मार्गे राडे मळा पाटील मळा आदी वस्त्यांना जोडणेसाठी रस्ता मंजुर करणेत यावा.
 • कृष्णा नदीच्या महापूरापासून संभाव्य धोका टाळणेसाठी पुरसंरक्षक भिंत टप्पा नं. 2 मंजूर करणेत यावा.
 • आमणापूर गावातील कृष्णा नदीकाठी भव्य क्रिडांगणास अनुदान मिळावे.
 • गावातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर व्हावे.
 • कृष्णा नदी गावपाणवठयालगत कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बाधणेस मंजूरी मिळावी.
 • बोरजाईनगर अनुगडेवाडी पुलानजीक श्रीरामनगर आमणापूर या ठिकाणी महाराष्ट्र रोजगारहमी योजनेतून 2 कि मी परिसरात रस्ता सुशोभिकरण व वृक्षारोपन करणेत यावे.
 • गावातील वीज योजनेपासून वंचित पाटील मळा राडेमळा येळवीर रस्ता अनुगडेवाडी रस्ता कुंडल रस्ता पलूस रस्ता आदी ठिकाणी स्ट्रीलाईन मंजूर करणेत यावी.
 • अपारंपारिक उर्जा मंत्रालयाच्या योजनेतून सौरउर्जा दिवे बसविणेत यावेत.
 • भारयिमनमुळे शेतकयांच्या उत्पन्नात घट व सर्व नागरिकांना सर्व पायाभूत समस्यांना तोंड दयावे लागत असून दिवसा भारनियमन कमी प्रमाणात करणेत यावे.
 • गावातील विद्यार्थी विद्यार्थिंनीसाठी आर्टस कॉमर्स सायन्स महाविद्यालय मंजूर व्हावे.
 • बचतगटातील महिलांना घरगुती उद्योग व प्रशिक्षण मिळावे.
 • केंद्रीय ग्रामसडक योजनेतून कृष्णा नदीवर आमणापूर अंकलखोप दरम्यान पुलबांधकाम झाला असून सदर प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेतलेले नाही ही या गावातील नागरिकांची खंत आहे.