आठवङे बाजार

 आठवङे बाजार–

  • आमणापूर गावचा आठवडा बाजार मेजर वसंत लक्ष्मण मोरे भगवान जगन्नाथ भिसे यांनी 13 मे 1991 ला पहिल्यांदा आठवडा बाजार सुरु केला गावातील व्यापारी बाहेर गावचे व्यापारी गावातील छोटा शेतकरी आपल्या शेतीमालाची बाजारात विक्री करणेसाठी दुपारी 4 पासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असतात.  बाजारात फळे पालेभाज्या कांदे बटाटे कपडे घरगुती वापरासाठी लागणारी भांडी चपला विक्रीसाठी असतात.
  • गावातील आठवडा बाजारपेठेमुळे गावातील शेतकयांना आपल्या शेतातील भाज्या, कांदा वांगी व कडधान्ये तसेच बोरजाईनगर विभागातील द्राक्ष बागायतदारांना गावातच द्राक्ष विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे.  बाजारातील खरेदी करण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी असते.
  • आमणापूर आठवडा बाजार गुरुवारी असतो हे पंचक्रोशीतील नागरिकांना प्रसिध्द आहे.  बाजारामध्ये आर्थिक उलाढाल मोठया प्रमाणात हाते बाजारातील सोनाली भडंग प्रसिध्द आहे.