जलस्तोत्र

जलस्तोत्र–

  • कृष्णा नदीच्याकाठी गाव असूनही कोरडवाहू जमिन कै. मा. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्यातून सुरु असणाया लिफ्ट इरिगेशन संस्था श्री. राम, ज्योर्तिलिंग, बसवेश्वर कृष्णामाई, आदी पाणीपुरवठा संस्थानी खाजगी वैयक्तिक मालकीच्या पाणीपुरवठा करणाया 250 शाखा यांच्या सिंचनाद्वारे 3300 एकर बारमाही सिंचन होत आहे.  कृष्णामाईच्या प्रसन्नतेने ऊस शेती गहू सोयाबीन इतर नगदी पिके घेतलेली जातात शेतीसाठी पाणीपुरवठा करणाया मोठया संस्थेपैकी श्री. राम सह. पाणीपुरवठा संस्था ही गावची सर्वात मोठी संस्था आहे.  संपूर्णपणे शेतकयांच्या सहकार्यातूनही सुरु झालेली आहे  कृष्णामाई सहकारी पाणीसंस्था ज्योर्तिलिंग बसेवश्वन सहकारी पाणीपुरवठा संस्था व खाजगी शेतकयांच्या वैयक्तिक पाणीपुरवठा करणाया संस्थाच्या माध्यमातून जवळपास सर्व ओम बारमाही सिंचन येणेच्या मार्गावर आहे परंतु आमणापूर गावचे आरपड क्षेत्र 326/65 हे. आर. ऐवढे क्षेत्र असलेने गावातील शेतकयांसमोर शेतजमीन असूनही नापिकीचा धोका वाढलेला आहे सदरचे क्षेत्र वर्षानुवर्षे वाढत आहे शेती व शेतकयांच्या दृष्टीकोनातून धोकादायक आहे.  जलसंधारण विभागाच्या माध्यमातून यासाठी केंद्र शासन व राज्य सरकार यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

  • गावातील पिण्याच्या पाण्याची सध्या कुंडल नळपाणीपुरवठा प्रादेशिक योजना कंुडल यांचे माफ‍र्त अपुरा नळपाणीपुरवठा व कमी दाबाने होत असतो कारण सध्या सदरचे योजनेवरील शेवटचे गाव असलेने अत्यंत कमी दाबाने नळपाणीपुरवठा होत असतो यासाठी ग्रामपंचायतीने 9 पी एच मधून अंदाजपत्रकीय रु. 17,00,000/– एवढया रक्कमेचे पिण्याचे पाण्याची टाकी बांधकाम पूर्णावस्थेत आहे.
  • एकूण विंधण विहीर बोअर चालू -6, बंद -1.