प्राणीसंपदा

पशुधन संपदा–

  1. देशी गाय–90.
  2. संकरीत गाय 129.
  3. बैल 101.
  4. म्हैशी 1795.
  5. रेडया 361.
  6. शेळया 955.
  7. मेंढया 2000.
  8. कोंबडया 2462.

वरीलप्रमाणे गावात पशुधन असून शेती बरोबर दूधव्यवसाय जोडधंदा केला जातो.

  • वाडया वस्त्यावर दूध संकलन करणेसाठी डेअरी आहेत आठवडयात पगार होत असल्यामुळे शेतकरी या व्यवसायाकडे बहुसंख्येने वळलेले आहेत.  सुशिक्षित बेरोजगार, तरुणांनी दूध व्यवसाय हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन केले आहे. गावात बैलाची संख्या जास्त असून त्यांचा प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी उपयोग केला जातो.  गावातील कै तुकाराम येसू पाटील ज्ञानदेव गोविंद गोरड श्री गणपती यशवंत आवटे, अशोक कांबळे कै अशोक नलवडे श्री अधिक संभाजी माने आदींनी दुबेली गाडयांच्या शर्यतीत राज्यात गावाचे नाव प्रसिध्द केलेले आहे.
  • गावात व्यवसायिक दृष्टिकोनातून कोंबडया पालनाचे काम घरगुती पातळीवर केले जाते.  गावात माधव राडे आण्णा साहेब पाटील विश्वनाथ सुर्यवंशी, सुभाष तातुगडे शामराव पाटील शिवाजी भोसले नामदेव तानुगडे आलींदर अनुगडे विजय थेंडगे रमेश अनुगडे आदींनी दूध संकलनाचे काम डेअरीच्या माध्यमातून होत आहे.  दूध संकलन दर दिवशी 2100/– एवढे लिटर होते चितळे डेअरी पाटील डेअरी वसंतदादा पाटील डेअरी , राजाराम बापू पाटील डेअरी, हुतात्मा डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन केले जाते.  दूध व्यवसायावर गावातील मोठया प्रमाणात स्वयंरोजगार उपलब्ध झालेला आहे परंतु आधुनिक काळानुसार दूधापासून निर्माण होणारे बायो प्रॉडक्ट गावात उपलब्ध झालेस मोठया प्रमाणात महिला व युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.